चंद्र


                                                                                       चंद्र

 


दिवस होता लपुनही जाई .

थकलेल्या त्या प्रत्येकाला ,

तुझी कुशी विसावा देई ,

 

तुज पाहता शीतलता मिळे ,

तू येण्याने प्रहरःही बदले .

जरी तू आहे रात्रीचा सोबती ,

तरी प्रकाश देणारा तू गुणधर्मी .

 

तू आकाशी न दिसलयास ,

 वाटे आमावस्या खंतड .

तू पूर्ण दिसता वाटे ,

पौर्णिमा  पावन ..

 

किती कलांनी विभागलेले रूप तुझे ,

तरी प्रत्येक  रूप  तुझे आहे मनमोहक ..

तुज वीण संध्या होत नाही,

तुज वीण रात्र शक्य नाही.

 

तुज वीण दिवस उजाडणे नाही.

तुज वीण भूगोल अपूर्णच राही.

कुणी तुज चंद्र म्हणे.

कुणाचा चांदोमामा तू..

 

तर कुणासाठी चांद तू.

तू एक अन तुझी नावे  अनेक ,

तुझे रूप एक स्तुती अनेक .

 

घेते सध्यापुरती निरोप आता ......

तुज कुशीत निजण्यास येते आता ......

येते आता....

 

 

शुभ रात्री

 

 

 

                                                 धनश्री पुंडलिक बडगुजर . 


Comments

Post a Comment