थकलेल्या त्या जीवाला




थकलेल्या त्या जीवाला ........ 

थकलेल्या त्या जीवाला ........

थकलेल्या त्या जीवाला ,
बस आसरा हवा असतो . 
आपल्या लोकांच्या साथीचा 
हाथ पुरा असतो ... 


दोन प्रेमळ शब्दांनीही  ,
त्यांचे मन फुलून येते . 
आयुष्यभर थकलेल्यांना ,
जगण्याची उमेद मिळते . 

इवला इवला जीव त्यांचा ,
तुमच्यासाठी झुरतो . 
आधाराची गरज ये त्यांना ,
तुमचा आधार हवा हवा सा वाटतो . 


विसरलेल्या त्या प्रत्येकाला ,
आज आठवण करावी वाटते . 
थकलेल्या त्या जीवाला ... 
तुमचीच गरज वाटते ...... 
तुमचीच गरज वाटते...    



धनश्री पुंडलिक बडगुजर 

Comments

Post a Comment